कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत ज्या ठिकाणी कचरा टाकत आहे त्या जागेत अनधिकृतरित्या मैला उतरविला जात आहे ही घटना समजतात कुडाळ नगरपंचायतीचे भाजपच्या नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार रोखला आणि या मैला टाकणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली.

नगरपंचायत मार्फत खाजगी जमिनीमध्ये कचरा टाकला जात आहे आणि ही जागा कचरा टाकण्यासाठी माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी दिली मात्र आता कच-या बरोबरच मैला टाकला जात आहे ही बाब भाजपचे नगरसेवक अभिषेक गावडे यांना समजल्यावर त्यांनी या मैला घेऊन जाणाऱ्या गाडीवर लक्ष ठेवला अखेर आज सोमवार ४ एप्रिल रोजी कचरा टाकला जाणाऱ्या जागेत मैला उतरविला जात असल्याचे समजले आणि रंगेहात या मैल टाकणाऱ्या गाडीला पकडली.

त्यानंतर त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे नगरपंचायतीचे भाजपचे गटनेते विलास कुडाळकर निलेश परब, एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, राजेश पडते, चंदन कांबळी आदी उपस्थित होते.

कुडाळ नगरपंचायतीचे कचऱ्यासाठी असलेले डम्पिंग ग्राउंड हे खाजगी जागेत आहे. या ठिकाणी फक्त कचरा टाकण्यासाठी परवानगी संबंधित मालकांनी दिली असताना त्या ठिकाणी महिला टाकला जात आहे. हे लक्षात आल्यावर भाजपच्या नगरसेवकांनी मैला रोखला एका संस्थेमार्फत हा मैला टाकला जात आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपंचायती करून घेतलेली नाही. याचा जाब नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना नगरसेवकांनी विचारला त्यांनी सांगितले की, या ठिकाणी मैला टाकण्यासाठी मी कोणत्याही प्रकारे परवानगी दिलेली नाही तसेच टाकण्यास सांगितलेली नाही असे सांगितले यावर नगरसेवक आक्रमक झाले मग कोणाचीही परवानगी नसताना संस्था अनधिकृतरित्या कशी काय मैला टाकते असा सवाल उपस्थित करण्यात आला. नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांना धारेवर धरले. दरम्यान माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी सांगितले की, आम्ही ही जागा कचरा टाकण्यासाठी दिली होती कुडाळ शहरातील नागरिकांची व्यवस्था व्हावी म्हणून ही जागा दिली होती मात्र अशाप्रकारे मैला टाकला जातो हे चुकीचा आहे त्यामुळे आमचा याला विरोध आहे. तर गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितले की या ठिकाणी अनधिकृत मैला टाकला जात आहे त्यामुळे ज्या संस्थेमार्फत हा कचरा टाकला जात आहे तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी पोलीस ठाण्यात करणार आहोत. तर नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, अशाप्रकारे मैला टाकणेही चुकीचं आहे याबाबत नगराध्यक्ष आफरीन करोल यांना कळविले असता त्यांनी या ठिकाणी यायला मला वेळ नाही असे सांगितले म्हणजेच यांना शहराच्या नागरिकांबद्दल किती आस्था आहे. हे समजून येत आहे असे त्यांनी सांगितले

कचरा बंद करणार..

या प्रभागाचे नगरसेवक निलेश परब यांनी सांगितले की, कचऱ्यासाठी ही जागा दिली होती मैला टाकण्यासाठी नाही त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो त्यामुळे याठिकाणी आता कचरा सुद्धा टाकायला आम्ही जमीन मालक देणार नाही असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page