You are currently viewing कणकवली महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी पदवी प्रदान समारंभ..

कणकवली महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी पदवी प्रदान समारंभ..

कणकवली /-

कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात येत्या शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजता ग्रंथालय हॉलमध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर.जे. पवार तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, चेअरमन पी.डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त डॉ.राजश्री साळुंखे, अनिल डेगवेकर व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर व एम.ए.,एम.कॉम.मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाईल. तरी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..