You are currently viewing आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिराचा १०० जणांनी घेतला लाभ 

आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिराचा १०० जणांनी घेतला लाभ 

वेंगुर्ला /-

 श्री देव वेतोबा देवस्थान आरवली आणि आनंद सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव वेतोबा सभागृह आरवली येथे मधुमेह चिकित्सा ( निदान, उपचार आणि मार्गदर्शन) शिबीर संपन्न झाले.या शिबिरात पंचक्रोशीतील सुमारे १०० रुग्णांनी लाभ घेतला.डॉ. विवेक पाटणकर कुडाळ, डॉ. मिलिंद पटवर्धन मिरज – सांगली, डॉ. दिगंबर नाईक पणजी – गोवा या तज्ञ डॉकटरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष  जयवंत राय यांनी सदर शिबिरात मार्गदर्शन केले.तसेच डॉ. पटवर्धन, डॉ.नाईक, डॉ. पाटणकर यांनी आहार व जीवनशैली या विषयी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले.यावेळी श्री देव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ. प्रसाद प्रभूसाळगावकर, आनंद सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर मंत्री, सचिन दळवी, जनार्दन पडवळ,राजन शिरोडकर, शरद परुळेकर,सचिन गावडे आदी उपस्थित होते.सदरचे शिबीर हे दर ३ ते ४ महिन्यांनी घेण्याचे निश्चित करण्यात आले.आनंद सेवा प्रतिष्ठानचे अवधूत येनजी यांनी आभार मानले. 

अभिप्राय द्या..