नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी,संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर २२मार्च २०२२ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत दोडामार्ग मधील शिरंगे येथे घेण्यात आले असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा,शिस्त,स्वच्छता आरोग्य,पर्यावरण संवर्धनाची जाणीव, राष्ट्रीय एकात्मता,समता, सहकार्याची भावना व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत हे शिबीर घेण्यात येते, शिक्षणा बरोबरच या सर्व गोष्टी जीवन जगण्यासाठी उपयुक्त असतात यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणेत खूप मोठा चांगला बदल होऊ शकतो व आयुष्य उज्वल बनण्यास मदत होऊ शकते हे उद्दिष्ट समोर ठेवून हळबे कॉलेज दरवर्षी हे शिबिर भरवतात मात्र गेली दोन वर्षे कोरोना चा थैमान पाहता व शासनाचे कोरोना संदर्भात घालून दिलेले निर्णय लक्षात घेता हे शिबीर भरवले नसून यावर्षी मात्र हे शिबीर भरवण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर,कृषी योजनांची माहिती,वनराई बंधारे व इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.
त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते लक्ष्मीबाई सिताराम हळबे या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिरंगे पुनर्वसन येथील संपूर्ण गावात फिरत हे प्रबोधनात्मक कार्यक्रम केले असता येथील शिरंगे वासीयांचा देखील त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व शिरंगे वासीयांनी देखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली शिक्षण घेता-घेता या सर्व सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि ते राबवणे महत्त्वाचे असते याचे पूर्ण श्रेय हळबे कॉलेजच्या शिक्षकांना तसेच येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना देखील याचे पूर्ण श्रेय दिले जाते शिक्षकांनी देखील मुलांबरोबर रात्रंदिवस राबत मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारत ती जबाबदारी उत्कृष्टरित्या पूर्ण करत मुलांना योग्य ते मार्गदर्शन दिले,
मुलांनी प्रत्येक उपक्रम उपभोगला पाहिजे या उपक्रमातून मुलांची जडणघडण होत असते आणि आपले वैवाहिक जीवन जगण्यासाठी मुले परिपक्व होत असतात असाच काहीसा उपक्रम राबवत हळबे महाविद्यालयातील मुलांनी संपूर्ण जिल्ह्याकडून कडून कौतुकाची थाप घेतली दिवसभर अनेक प्रकारचे गावात उपक्रम राबवत ही मुले रात्री पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सज्ज राहत सांस्कृतिक कार्यक्रमातून अनेक समाजसुधारक बोध देत नाटिका,मृत्य, गायन अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश केला जायचा आणि महाविद्यालयातील शिक्षकांसह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे देखील त्यांना मोठे मार्गदर्शन असायचे गेल्या सात दिवस शिरण पुनर्वसन मध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश पडायचा जो शिरंगे गावातील लोकांना ऊर्जा द्यायचा असं म्हटलं जायचं असा त्यांचा उपक्रम राबवत तो अनेक माध्यमांद्वारे पूर्ण जिल्हाभर पसरला असता जिल्ह्यातील संपूर्ण मार्गदर्शकांचे लक्ष्मीबाई हळबे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे,यामध्ये लक्ष्मीबाई हळबे कॉलेजचे शिक्षक बर्वे सर यांचा आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरंगे या शाळेचे शिक्षक भोसले सर,पालवे सर,नाईक सर या अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले मंचावर जाण्याची इच्छा प्रत्येक विद्यार्थ्याची असते मात्र त्यांना मंच मिळवून देणे हे महत्त्वाचे असते आणि हेच काम या सर्व शिक्षकांनी केले असून यामुळे शिक्षकांचे देखील कौतुक पूर्ण जिल्हाभर करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page