कुडाळ /-

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव बाजार येथे दिनांक २६ व २७ मार्च रोजी भव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रित १६ संघांमध्ये हि स्पर्धा होणार असून २६ मार्च रोजी सायंकाळी ०६:०० वाजल्यापासून सामने सुरु होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रु. व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रु. व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना रोख रक्कमेचे बक्षीस तसेच आकर्षक चषक व ईतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी माणगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने, युवक कल्याण संघ व शिवसेना माणगाव व घावनळे विभागाच्या वतीने हि कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी व आकर्षक विद्यूत रोषणाईत भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेसह विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.तरी कबड्डी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कबड्डी स्पर्धेचा आनंद घ्यावा. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी मोबा- 9518773665, 9421268890, 7774900634 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, रमाकांत तामाणेकर विभाग प्रमुख माणगाव अजित करमळकर, कौशल जोशी विभागप्रमुख घावनळे रामा धुरी, रमाकांत धुरी, बापु बागवे, दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, सागर म्हाडगुत, प्रशांत म्हाडगुत, सुधीर राऊळ, राजू तामाणेकर, आपा मुंज शैलेश विर्नोडकर, रूपेश धारगळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page