खारेपाटण /-

खारेपाटण चेकपोस्ट पुलावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट जवळील सुक नदी पात्रात भारत बेंज कंपनीचा कंटेनर (एम.एच.47-ऐ.एस.2266) कोसळला आहे.या कंटेनर मधील दोघे जण ठार झाले आहेत,तर एकाची अजून ओळख पटली नाही.मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण चेकपोस्ट नजीकच्या पुलावर कणकवली कडून रत्नागिरी कडे जात असताना कंटेनर ८० ते ९० फूट नदीपात्रात खाली कोसळला आहे.सदर अपघाताचे ठिकाणी तत्काळ खारेपाटण चेक पोस्ट वरील पोलीस अंमलदार उद्धव साबळे व वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मदती करीता धाव घेऊन अपघातातील दोन जखमींना तात्काळ बाहेर काढुन उपचाराकरीता खारेपाटण प्रा.आ. केंद्र येथे दाखल केले.मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सरस्वती कोळी यांनी त्यांना तपासुन मयत घोषितत केले.मयत मधील एकाची ओळख पटली आहे.तर एकाची ओळख अजून पटली नाही.सदर ठिकाणी तसेच डी. वाय. एस. पी विनोद कांबळे कणकवली यांनी भेट देऊन अपघातग्रस्त ठिकाणची पहाणी केली. नदी मध्ये पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कंटेनर बाहेर काढण्यास आडथळा येत होत आहे.आद्यप पर्यत अबघात ग्रस्त कंटेनर हा नदीपात्रात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page