कणकवली /-
संतोष परब हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली तालुका प्रवेश बंदी करण्यात आली होती. १६ मार्च रोजी त्यांनी चार्टशीट दाखल केल्यानंतर कणकवली प्रवेशाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आज आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत हे कणकवलीत दाखल झाले. यावेळी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर ते दाखल होताच त्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष तथा पं. स. उपसभापती मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे तसेच इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.