वेंगुर्ला /-
म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील म्हापण ग्रामपंचायत क्षेत्रातील जुनव्हाळ वाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. श्री बाळा राऊळ, श्री अंकुश परब आणि त्यांच्या वाडीतील २६ कुटुंबातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, तालुका प्रमुख बाळु परब, विभाग प्रमुख योगेश तेली, उप विभाग प्रमुख वसंत साटम, विष्णू माधव, केळुस सरपंच किशोर केळुसकर, ग्रा प सदस्य भाई घाडी, शाखा प्रमुख अवीनाश खोत, केळुस शाखाप्रमुख भरत साटम, कोचरे शाखाप्रमुख बाळा राऊळ, शरद हडकर, बाबल घाडी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या विभागातील उर्वरित विकास कामे आहेत ती खासदार श्री विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेब व माजी पालकमंत्री आमदार श्री दिपकभाई केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री अरूणभाई दुधवडकर यांच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले.तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितल्या प्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम सर्वांनी राबवूया आणि कोरोना हद्दपार करूया असे आवाहन केले.