You are currently viewing सौ.माधवी मधुसूदन गावडे यांची महिला काथ्या कामगार औद्यो.सह.संस्था वेंगुर्ले च्या चेअरमनपदी निवड.

सौ.माधवी मधुसूदन गावडे यांची महिला काथ्या कामगार औद्यो.सह.संस्था वेंगुर्ले च्या चेअरमनपदी निवड.

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले येथील महिला काथ्या कामगार औद्यो. सह. संस्थेच्या चेअरमनपदी माधवी मधुसूदन गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महिला काथ्या कामगार औद्यो. सह. संस्थेची पंचवार्षिक निवडणुक सहकार खात्याचे अधिकारी कावले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात पार पडली.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माधवी मधुसूदन गावडे व व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब या असुन संचालक मंडळ म्हणून लिला कृष्णा परब, सोनाली साळगावकर, श्रुती रेडकर, अनुराधा परब, रंजना कदम, प्रविणा खानोलकर, रक्षिता रो. गोवेकर व छाया भाईप यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना काथ्या उद्योगाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन देताना रत्नागिरी जिल्ह्यातही काथ्या उद्योगासाठी प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन माधवी गावडे यांनी सांगितले.गेली १५ वर्षे संचालक म्हणून माधवी गावडे संस्थेत कार्यरत आहेत. महिला काथ्या कामगार औद्यो सह. संस्था ही प्रज्ञा परब व कै. सुवर्णलता नवार यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. सन १९८८ मध्ये स्थापन झालेली संस्था २००७ पर्यंत शिरोडकर कंपाऊंड येथे भाड्याच्या जागेत सुरू होती. २००७ साली प्रज्ञा परब व तत्कालिन संचालक मंडळ यांनी ३ एकर जागा विकत घेऊन स्वतःचा प्रकल्प उभा केला. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातही काथ्या उद्योगाची मुहूर्तमेढ महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या., वेंगुर्ले या संस्थेने रोवली. राज्य व केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करुन काथ्या उद्योगाला उर्जितावस्था आणली. आजपर्यंत हजारो महिलांना काथ्याचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले गेले व अजूनही देत आहेत.आता राज्यशासनाबरोबरच केंद्रशासनही काथ्या उद्योग वाढीसाठी खुपच मदत करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा