ओरोस /-

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 12 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून भारतीय जनता पार्टी ओरस मंडलाच्यावतीने वेताळ-बांबर्डे आग्रह हॉटेल पटांगण येथे ‘महिला व बाल आनंद मेळावा’ आयोजित केला आहे.यामध्ये लहान मुलांसाठी खाऊ गल्ली, महिलांसाठी होम मिनिस्टर म्हणजेच खेळ पैठणीचा, हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री आठ वाजता जेवण अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडल अध्यक्ष, दादा साईल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page