बांदा /-

बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभापती शर्वरी गावकर यांनी दिले आहे.

यावेळी स्वतः बांदा येथे येऊन अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याने सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, मकरंद तोरसकर, हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, बाळू सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page