You are currently viewing प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग छेडणार बेमुदत धरणे आंदोलन.आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी करणार आंदोलन..

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग छेडणार बेमुदत धरणे आंदोलन.आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी करणार आंदोलन..

सिंधुदुर्ग /-

वर्षभर आंतरजिल्हा बदली पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत व मा . शिक्षणाधिकारी जि . प . सिंधुदुर्ग यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे . तसेच ३ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षक भारतीच्या वतीने झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने मा.जिल्हा परिषद अध्यक्ष व मा . शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेतील आश्वासनाची कार्यवाही अद्याप झालेली नाही व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत अशी संघटनेची धारणा झालेली असून याबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त आहे.तरी शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने सोमवार दिनांक १४/०२/२०२२ पासून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ असे मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिली आहे.व जिल्ह्यातील सर्व शिक्षकानी या लढ्यात मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..