You are currently viewing जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैथिली घोगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम…

जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैथिली घोगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम…

सिंधुदुर्ग /-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील नांगरतासवाडी, आंबोली येथील कु. मैथिली अनंत घोगळे हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत व शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.सई लिंगवत यांनी पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार केला.

कु. मैथिली हि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांगरतास, आंबोली क्रमांक ३ ची, इयत्ता सहावी मधील विद्यार्थीनी असुन शाळेचे मुख्याध्यापक युवराज तिप्पे,वर्गशिक्षक सदानंद चौगुले, सहशिक्षिका विद्याताई पाटील,सहशिक्षक विद्याधर पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले.

कु.मैथिली हिचे वडील अनंत बाळु घोगळे हे ग्रामपंचायत आंबोली येथे पाणी पुरवठा कर्मचारी असुन अतिशय ग्रामीण भागात असलेल्या कु.मैथिली हिने मिळविलेल्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात व पंचक्रोशीत तीचे कौतुक करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..