You are currently viewing जि. प. च्या ” पाऊले चालती पंढरीची वाट” उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ.

जि. प. च्या ” पाऊले चालती पंढरीची वाट” उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ.

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी हजारो वारकरी या पंढरपूर पायी वारीत सहभागी होतात. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागामार्फत या संपूर्ण वारी प्रवासात वारकऱ्यांसाठी एक सुसज्ज ॲम्बुलन्स, वैद्यकीय अधिकारी, अत्यावश्यक औषधे, कर्मचारीवर्ग सोबत राहणार आहे. ‘सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट’ या उपक्रमाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते कलमठ कलेश्वर मंदिर येथून करण्यात आला. दुसरे पथक हे माणगाव येथून आंबोली मार्गे पंढरपूर असा प्रवास करणार आहे. यावेळी वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. गवडळकर महाराज, जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..