You are currently viewing उद्या नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी काय निर्णय होणार ?

उद्या नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी काय निर्णय होणार ?

कणकवली /-

शिवसैनिक संतोष परब हल्ल्यात आरोपी असलेल्या आमदार नितेश राणेंच्या सुप्रीम कोर्टातील अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या 27 जानेवारी रोजी काय निर्णय होणार ? याकडे मुंबईसह सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. आज 26 जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी कणकवली पोलीस ठाण्यात येऊन आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी तपासकामात सिंधुदुर्ग पोलिसांना सहकार्य केले आहे. आज कणकवली पोलीस ठाण्यात संतोष परब हल्ला प्रकरणी तपासकामी हजर झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या गुन्ह्यात पोलिसांनी नोटीस दिल्यानुसार तपासकामी समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांना सहकार्य केले आहे. यापुढेही पोलिसांना सहकार्य करणार असे म्हटले आहे.त्यामुळे सलग 3 दिवस पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून पोलिसांना सहकार्य करण्याची आमदार नितेश राणेंची भूमिका उद्या सुप्रीम कोर्टात होणाऱ्या अटकपूर्व जामीन सुनावणी वेळी फायद्याची होऊन अटकपूर्व जामीन मंजूर होणार की अटकपूर्व जामीन फेटाळला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

अभिप्राय द्या..