You are currently viewing वजराट गावातील विकासात्मक कामांसाठी जि.प.मार्फत नेहमीच सहकार्य राहील.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत.

वजराट गावातील विकासात्मक कामांसाठी जि.प.मार्फत नेहमीच सहकार्य राहील.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत.

वेंगुर्ला /-


वजराट गावातील या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत नेहमी पाठिंबा व सहकार्य राहील.कोणतेही सार्वजनिक विकासात्मक काम असेल तर निसंकोचपणे आमच्याकडे आणा जि. प. आणि भाजपा च्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करू, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी वजराट येथे बोलताना केले.वजराट येथे ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षा सावंत यांचे आगमन होताच सरपंच महेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वजराट ग्रामपंचायत च्या माध्यमातून जलजीवन आराखड्यातून मंजूर झालेल्या वजराट गावातील घोगळवाडी, राणेवाडी, पेडणेकरवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष्या संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब,श्री देव गिरेश्वर सोसायटी चेअरमन बाबुराव परब,माजी सरपंच दीपिका राणे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला राणे, शारदा देसाई, विजय नळेकर, तसेच मंगेश परब, वसंत परब, राजन परब, सूर्यकांत परब, चंद्रकांत राणे, जयवंत राणे, नंदकिशोर राणे, बुवा राणे, दिगंबर देसाई, प्रशांत देसाई, नाना पेडणेकर, सूर्यकांत घोणे, श्रीकृष्ण कांदे, ग्रामसेवक गावडे, भाजपचे पदाधिकारी नितीन चव्हाण, प्रवीण गावडे, विजय रेडकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, वामन भोसले, संतोष राणे, सुरेश राणे, साई केरकर,
पेडणेकर, वैद्य यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा