You are currently viewing भात खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

भात खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग,रत्नागिरी सह राज्यातील चंद्रपुर , नाशिक ,पालघर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावरील विविध अडचणींमुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीकरिता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न हा आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडला होता. तसेच अभिकर्ता संस्थांकडून अवकाळी पावसामुळे काही खरेदी केंद्रांवर धान खरेदी करिता ३१ जानेवारी , २०२२ नंतर काही दिवसांकरिता मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सिंधुदुर्ग-रत्नागिरी सह चंद्रपूर, नाशिक , व पालघर या जिल्ह्यामध्ये धान खरेदीसाठी NeMt. पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारी, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी मुदतवाढ देताना कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी असे आदेश शासनाने दिले आहेत. ज्या ठिकाणी धान खरेदीकरिता दिनांक ३१ जानेवारी , २०२२ नंतर मुदतवाढ आवश्यक आहे अशी अभिकर्ता संस्थांची खात्री झाल्यास, अशा ठिकाणी मुदतवाढीबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने शासनास सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..