You are currently viewing आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी /-

आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे ( आकेरी) असे त्या युवकाचे नाव असून, याबाबतची खबर त्याचा भाऊ ऋषिकेश गावडे यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..