You are currently viewing जानवली ग्रा.पं.चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माझ्यावर अविश्वास ठराव.;जानवली उपसरपंच शिवराम राणे यांचे स्पष्टीकरण.

जानवली ग्रा.पं.चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माझ्यावर अविश्वास ठराव.;जानवली उपसरपंच शिवराम राणे यांचे स्पष्टीकरण.

कणकवली /-

कणकवली जानवली ग्रा. पं. उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव हा जानवली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी व सरपंच शुभदा राणे यांच्यावर कोकण आयुक्तांकडून होणाऱ्या कारवाईच्या आकसातून दाखल करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच शिवराम राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

जानवली ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवराम भास्कर राणे यांच्यावर काल कणकवली तहसीलदार यांच्याजवळ अविश्वास प्रस्ताव सादर केला गेला. सरपंच कार्यरत असतेवेळी, उपसरपंच यांच्यावर अविश्वास दाखवणे गैर आहे. सरपंचांचे बहुमत असतेवेळी गावच्या कामांच्या विकासकामात हस्तक्षेप करणे हे एकट्या उपसरपंचाला कसे शक्य आहे. ग्रामसभेमध्ये व पाणीपुरवठा स्वच्छता समितीमध्ये ठरावाला विरोध करणे जर ६५ लाख रुपये खर्च करून नवीन नळ योजना बंद असेल, तर लोकहितासाठी सदर योजनेचे बिल काढणे व योजना ताब्यात घेणे, याला विरोध करणे याला माझे कर्तव्य आहे. वने जमिनीमध्ये बांधकामाला व प्रदूषित व्यवसायाला ना हरकत दाखला देणे हे दिनांक ११ डिसेंबर, २०१५ च्या कार्यपद्धतीचा अवलंब न करणे असे ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रक आहे. तसेच वाणिज्य दाखले, निवासी इमारतीचे असेसमेंट, प्रांत कार्यालयाकडील पूर्णत्वाचा दाखला न घेता असेसमेंट करणे अशा ठरावांना लोकप्रतिनिधी म्हणून सूचना करणे व विरोध करणे माझे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीच्या ताब्यातील पाईप चोरीला जाऊनही पोलिस स्टेशनला तक्रार न करणे तसेच पथवर्ती किनाऱ्याच्या नियमांचा भंग करणाऱ्या बांधकामाचे असेसमेंट करणे, शासनाने नेमलेल्या सचिव महिला ग्रामसेविका अर्चना लाड यांच्यावर दबाव टाकून काम करून घेणे, भर सभेत मारहाण करण्याची धमकी देणे व मानसिक छळ करणे याबाबत आवाज उठवत असल्यामुळे व ग्रामपंचायतीत चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवत मुळे असल्याव शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत असल्यामुळे राजकीय आकसापोटी, राणे भाजपाने माझ्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. जरी भविष्यात अविश्वास प्रस्ताव पारीत झाला तरी जानवली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार, असे श्री. राणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा