देवगड /-

सध्याच्या जगात पेट्रोल डिझेलचे दर मर्यादेपेक्षा वधारत असताना देवगड मधील आनंदवाडी गावातील अनिश कोंडे या तरुणाने इलेक्ट्रिक आउट बोर्ड म्हणजे इलेक्ट्रिक इंजिन चा शोध लावला आहे. या अगोदर भारतात इलेक्ट्रिक बोटींचा आविष्कार झाला आहे पण बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनचा हा पहिलाच आविष्कार अनिश नाही करून दाखवला आहे.

इलेक्ट्रिक वर चालणारी टू व्हीलर आणि फोर व्हीलर आली पण देवगडमधील अनिश कोंडे या तरुणाने आपल्या सर्व मच्छीमार बांधवांचा विचार करता तारक नावाचे इलेक्ट्रिक आउट बोर्ड इंजिन तयार केले आहे या अगोदर आपण यामाहा किंवा सुझुकी कंपनीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारी इंजिन पाहिल्या असतील तर पेट्रोलच्या खर्चापेक्षा 90 टक्के बचत करते हे इलेक्ट्रिक इंजन तुम्हाला 10 व्हावात समुद्रात नेऊन परत किनाऱ्यावर आणू शकतो अनिश कोंडे यांनी कोणतीही इंजिनिअरिंग न करता फक्त इलेक्ट्रॉनिक विषयक अभ्यास आणि तीन वर्षे सातत्याने मेहनत घेत हे इलेक्ट्रिक कार्डबोर्डचा पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं आह.

हे इंजिन पूर्णपणे मेड इन इंडिया असून यामध्ये सर्व यंत्रणा आणि स्पेअर पार्ट हार्डवेअर हे भारतीय दर्जाचे आहेत अनिश कोणते म्हणजे देवगड मासेमारी सोसायटीचे चेअरमन द्विजकांत यांचा सुपुत्र. द्विजकांत कोयंडे आणि संपूर्ण कोयंडे कुटुंबीय गेली कित्येक पिढ्या मासेमारी व्यवसायात असल्याने मला देखील त्याची लहानपणापासूनची निर्माण झाली होती आणि ची असलेली जिद्द चिकाटी आणि कौटुंबिक आधाराच्या जोरावर त्याने हा करिष्मा करून दाखवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page