You are currently viewing शिक्षक संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न. विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित

शिक्षक संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न. विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी /-

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा- 2022 खा. प. शाळा नानेली येथे आज संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माणगाव हायस्कूलचे प्राचार्य आकेरकर सर, श्री राजेश कविटकर (सदस्य जि.प.)सौ. शरयु घाडी (पंचायत समिती सदस्य)नानेली शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अमोल दळवी, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कुंभार सर, सचिव वरक सर, रोशन बारदेस्कर, परशुराम गाडी,मेस्त्री गुरुजी, वारंगी गुरुजी, चेतना म्हाडगुत, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून झाली. त्यानंतर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश कविटकर यांच्या हस्ते झाले. सचला आरोलकर, विनया शिरसाट, खोत, नाईक, हंजनकर या शिक्षिकांनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले. संघटनेच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित असणार्‍या सर्वांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सचिव श्री. वरक सर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. माजी निवृत्त शिक्षक यांना शाल,श्रीफळ,पुष्प देऊन गौरवण्यात आले. शिक्षकांसाठी राबवलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांक श्री धोंडी गंगाराम वरक, द्वितीय श्रीम.रतन रामचंद्र डोईफोडे, तृतीय स्वरा स्वप्निल राऊळ यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय गरीब व होतकरू मुलांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. शिक्षक पाल्य त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांची मनोगते झाली यामध्ये आकेरकर सर म्हणाले, ‘तुम्ही शाळेत गेल्यानंतर कुटुंब विसरले पाहिजे आणि शाळा हेच माझे कुटुंब या भावनेतून मुलांसोबत एकरूप झाले पाहिजे’ यानंतर वारंग गुरुजी ,राजेश कविटकर, अमोल धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याशिवाय पुरस्कार प्राप्त शिक्षक मधून आरोलकर मॅडम, कांबळी मॅडम यांनी तर निवृत्त शिक्षका मधून पाटकर मॅडम, केळुसकर गुरुजी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता गोलतकर यांनी सर्वांचे आभार मानले. तर सूत्रसंचालन विशाल धुरी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यातून संपन्न करण्यात आला.

अभिप्राय द्या..