कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांपैकी प्रभाग १६ (एमआयडीसी) यामधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर चव्हाण हे रिंगणात होते मात्र त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या प्रभागातील निवडणूक होणार की नाही याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला असून कुडाळ नगरपंचायतीचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की प्रभाग १६ मधील उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर तात्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे लवकरच मार्गदर्शन आल्यावर निवडणुकीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page