सिंधुदुर्ग /-
प्राथ शिक्षक पतपेढी सिंधुदुर्ग वारस संरक्षण निधी धनादेश वितरण सिंधुदुर्ग दि 22 सप्टेंबर 2020 सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी चे सभासद कै. नाना महादेव गोडगे (मालवण) यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीम मीनाक्षी गोडगे यांना संस्थेच्या वारस संरक्षण निधी योजनेतून *रु 15,00,000/-(रुपये पंधरा लाख)* चा धनादेश संस्थेचे अध्यक्ष मा श्री विठ्ठल गवस यांच्या हस्ते प्रदान करणेत आला.त्याच बरोबर कै गोडगे यांच्या संस्थेकडे जमा असलेल्या रकमेचाही धनादेश मालवण संचालक तथा उपाध्यक्ष श्री राजेंद्रप्रसाद गाड यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री दिनकर तळवणेकर,श्री नंदकिशोर गोसावी तसेच संस्थेचे सभासद श्री गणेश सुरवसे,संस्थेचे कर्मचारी व गोडगे यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सभासदांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबाला आधार मिळावा याकरिता जानेवारी 2020 पासून संस्थेमध्ये *वारस संरक्षण निधी* योजना कार्यान्वित करण्यात आली.विशेषतः DCPS धारक शिक्षकांचा विचार करता ही योजना अतिशय उपयुक्त असून सभासदांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला सावरणारी आहे.सर्व मालक सभासद शिक्षक बंधू-भगिनींच्या सहकार्यातून ही योजना सुरू असून त्या सर्वांचे पाठबळ गोडगे कुटुंबाच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन यावेळी मालवण संचालक तथा संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्रप्रसाद गाड यांनी केली.गोडगे कुटूंबियांवर उद्भवलेल्या दुःखद प्रसंगी प्राथ शिक्षक सह पतपेढीचे सर्व संचालक,कर्मचारी व मालक सभासद त्यांच्या पाठीशी राहिले व त्यांना धीर दिला त्या बद्द्ल कुटुंबियांच्या वतीने श्री सुरवसे यांनी सर्वांचे आभार मानले.