You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले स्वच्छता अभियान राबवून..

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले स्वच्छता अभियान राबवून..

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत हे भंगसाळ नदीच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून केले अशा प्रकारची स्वच्छता कुडाळ शहरातील बऱ्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगांवकर यांनी सांगितले.

कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कुडाळ भंगसाळ नदी घाट व नदीपात्र साफसफाई मोहीम हाती घेतली.यावेळी स्वच्छता निरीक्षक संदीप कोरेगाव, मुकादम दीपक कदम, विलास मुणगेकर, रोहित परब, गोट्या कोरगावकर, अनिश सावंत, केतन पवार, सतीश जाधव, यशवंत कुडाळकर, सुभाष जाधव, आत्माराम रामचंद्र बांबुळकर, संदीप कदम, किरण कदम, आत्माराम धाकू बांबुळकर उपस्थित होते.

फोटो नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेली स्वच्छता मोहीम

अभिप्राय द्या..