You are currently viewing शिरोडा समुद्रकिनारी आढळला पुरुष जातीचा मृतदेह..

शिरोडा समुद्रकिनारी आढळला पुरुष जातीचा मृतदेह..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचा एक मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीसांना समजतात पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी घटनास्थळी दाखल झाले.1 जानेवारी वर्षाचा पहिला दिवस असल्याने शिरोडा समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक पन्नास वर्षे वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येत समुद्र किनाऱ्यावर लागला आहे. याबाबत सागर रक्षक संजय नार्वेकर यांना हा मृतदेह दिसताच त्याने शिरोडा पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. त्या माहितीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून ओळख पटवण्यात आली.

अभिप्राय द्या..