You are currently viewing गणित-विज्ञान विषय शिक्षक रिक्त पदे भरणेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे निवेदन..

गणित-विज्ञान विषय शिक्षक रिक्त पदे भरणेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे निवेदन..

सिंधुदुर्ग /-

गणित-विज्ञान विषय शिक्षक रिक्त पदे भरणेबाबत महाराष्ट्र रा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत चालू असणाऱ्या ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक शाळेत गणित- विज्ञान विषय शिक्षकांच्या एकूण मंजूर पदापैकी ८५ टक्के पदे अद्यापही रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गणित - विज्ञान अध्यापनाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांअभावी गुणवत्ता खालावत असून पटसंख्या ही धोक्यात येऊ लागली आहे. RTE Act 2009 नुसार प्रत्येक वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध असणे बंधनकारक आहे.शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय १६ डिसेंबर २०१३ नुसार वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिले पद हे गणित-विज्ञान शिक्षका करता अनिवार्य आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे अनेक शिक्षक हे बारावी विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय १३ ऑक्टोंबर २०१६ मधील संदर्भ क्रमांक 6 नुसार सदर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार व शासन नियमानुसार गणित- विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती देऊन रिक्त पदे भरण्यात यावी. तसेच २५ फेब्रुवारी २०१९ ग्राम विकास विभाग शासन निर्णय पृष्ठ 3 वरील शासकीय परिपत्रक मुद्दा क्रमांक ३ नुसार १३ ऑक्टोबर २०१६ प्रमाणे बारावी विज्ञान प्राथमिक शिक्षकांना विज्ञान पदवी प्राप्त करण्याच्या अटीवर पदोन्नती देण्याची कार्यवाही अबाधित ठेवली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपुर यांनीदेखील दिनांक १२ ऑक्टोंबर २०२० रोजी बारावी विज्ञान शिक्षकांना सदर शासन निर्णयानुसार पदोन्नती दिली आहे. तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाने २९ व ३० डिसेंबर २०२१ रोजी १२ वी विज्ञान उत्तीर्ण अध्यापकामधून गणित व विज्ञान विषय शिक्षकांचे समुपदेशन ठेवले आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अध्यापकांची पदोन्नती द्वारे नियुक्ती करून अध्यापना अभावी होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल . तसेच गुणवत्ता व दर्जा वाढविण्यास मदत होईल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शिक्षकांनी विज्ञान पदवी साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रातप्रवेश घेतला आहे. शासन निर्णयानुसार पात्र व अर्हताधारक शिक्षकांचा विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती कार्यक्रम त्वरित राबवावा व शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग यांच्यामार्फत देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..