You are currently viewing कॉलेज युवतीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर..

कॉलेज युवतीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर..


कणकवली /-

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित देवदास बाबुराव करांडे यास गुरुवारी कणकवली पोलिसांनी अटक करून त्याचे विरुध्द भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ड), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला आज  येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला  १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. संशयिताच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे आणि ऍड. गायत्री मालवणकर यांनी काम पहिले.

याबाबत सदर युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूस संशयीत देवदास बाबुराव करांडे  (वय ३०, सध्या रा. बेळणे खुर्द, ता. कणकवली, मूळ राहणार गोंधळेवाडी, ता. जत, जिल्हा सांगली) हा गेल्या काही महिन्यापासून सदर युवतीच्या मोबाईलवर कॉल करून तिला व्हाट्सअप मेसेजकरून तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत होता. तसेच सदर युवतीच्या कॉलेजला येण्या जाण्याच्या रस्त्यावर तिचा चोरून पाठलाग करत होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी एकटीच असताना संशयित याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे.

या प्रकरणी सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित देवदास बाबुराव करांडे यास गुरुवारी ९ डिसेंबर, २०२१ रोजी अटक करून आज  येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याची  १५ हजार रुपयांचा जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली. संशयिताच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे आणि ऍड. गायत्री मालवणकर यांनी काम पहिले.

अभिप्राय द्या..