कणकवली /-
रत्नागिरी लांजा येथून सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे चाललेला टाटा कंपनीचा ट्रक शेडीव किटा खैर लाकूड अवैधरित्या घेऊन जाताना खारेपाटण चेकपोस्ट येथे सकाळी ६.३० च्या सुमारास खारेपाटण चेक पोस्ट येथे वन क्षेत्र अधिकरी यांनी पकडला. वाहन चालक विलास डोंगरे (रा.देवरुख) व मालक राजेश कोलपटे (रा. लांजा) यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी व पास मध्ये दाखवलेल्या माला पेक्षा अधिक सुमारे १५ते १६ घनमीटर माल गाडीत आढळून आल्याप्रकरणी त्यांच्यावर वनविभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
वन परिक्षेत्र कार्यालय कणकवली यांच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान कणकवली वनक्षेत्रपाल अधिकारी आर. एफओ घुनळीकर,वनपरिमंडल अधिकारी अनिल जाधव,तारिक फकीर,सत्यवान सुतार,वनरक्षक संजीव जाधव, विश्वनाथ माळी, अनिल राख,अतुल खोत,अतुल सुतार,एम पी शेगावे, श्रीम चंद्रिका लोहार,श्री शिर्के आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खारेपाटण चेक पोस्ट येथे आज करण्यात आलेल्या कारवाईत सदर खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पासा मध्ये तफावत आढळून आली.पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आलेला नाही.त्यामुळे सदर खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने आपल्या ताब्यात घेतला असुन पुढील अधिक चौकशी साठी फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकारी फोंडा कार्यलय येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती श्री राजेंद्र घुनळीकर वनक्षेत्रपाल अधिकारी कणकवली यांनी दिली.