You are currently viewing मायनिंगमुळे रेडी गावातील ग्रामस्थांना मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांची भूमिका

मायनिंगमुळे रेडी गावातील ग्रामस्थांना मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांची भूमिका

जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सुनावणी पूर्ण..

वेंगुर्ले /-

मिनरल्स अँण्ड मेटल या खाण कंपनी मार्फत नवीन जागेत होणाऱ्या मायनींगमूळे रेडी गावातील स्थानिकांना कोणताही त्रास नसेल तसेच याठिकाणची घरे, मंदिरे यांना धोका पोचत नसेल, यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होणार असेल तर ‘मिनरल्स अॅण्ड मेटल्स’च्या मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध नाही, अस मत काही ग्रामस्थांनी रेडी इथ आयोजित पर्यावरण विषयक जनसुनावणी दरम्यान व्यक्त केल. तर काहींनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती नसल्याने या जनसुनावणीवर विश्वास नसल्याचे सांगितले.एकूणच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचा पर्यावरण विषयक जनसुनावणी कार्यक्रम आटपून घेण्यात आला.

रेडी येथे सुरू होणाऱ्या नव्या मायनींग प्रोजेक्टबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आयोजित मिनरल्स अँण्ड मेटल्स ‘रेडी खाण कंपनी’ची पर्यावरण विषयक जनसुनावणी माऊली जल वॉटर प्लांट इथं शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कंपनीने नवीन मायनींग उत्खनना बाबत आपलं म्हणणं मांडत, या प्रोजेक्टमुळे गावाला, गावच्या देवस्थानांना कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नसून याआधीप्रमाणे ग्रामस्थांच्या हितासाठीच कंपनीचा पुढाकार असेल अशी ग्वाही कंपनीच्यावतीन दिली. यानंतर याबाबत ग्रामस्थांच्या हरकती घेण्यात आल्या. यावेळी काहिंनी आपली मतं व्यक्त करत आपले अर्ज प्रशासनाकडे जमा केले. तर संपूर्ण गावाच्यावतीन रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी बाजू मांडत असताना प्रकल्पाला विरोध नाही, मात्र मायनिंगमुळे होणाऱ्या समस्यांच निराकरण कंपनीन करावं असं मत व्यक्त केले.दरम्यान, मायनींग ज्या जागेत सुरू करणार त्या जागेतील घरे, देवस्थाने, स्मशानभूमी याना कोणताही धोका न करता जर मायनींग होत असेल तर गावाचा विरोध नाही. जमीनदारांना कंपनीने विश्वासात घ्यावे तसेच मायनींग सुरू करताना हद्द निश्चित करावी व नंतर काम करावे, गावात आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा दृष्टीने नियोजन करून स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा. या सर्व बाबींचा विचार कंपनीने केल्यास मायनींग ला विरोध नसल्याचे सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले.रेडी गावात गेली ७० वर्षे मायनींग सूरु असून यामुळे अनेकांना रोजगार निर्माण झाले आहेत. तसेच कंपनीने लोकहिताचेही बरेच निर्णय रेडी गावा संदर्भात घेतले आहेत. अन्य कोणताही प्रकल्प याठिकाणी नसल्याने मायनींग शिवाय पर्याय नाही. शासनाने दिलेले निर्बंध यांचे पालन करूनच कंपनीला याठिकाणी काम करावे लागते त्यामुळे ते गावच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाहीत अशी भुमिका स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मांडली. रेडी गावात मायनींग शिवाय पर्याय नसून यावर अनेकांना रोजगार मिळाला आहे. अनेक डंपर व्यावसायिक या मायनिंगवर व्यवसाय करतात. तर युवकांना रोजगारही मिळतो. यामुळे जर सार्वजनिक हिताचा निर्णय घेऊन मायनींग सुरू होत असेल याला विरोध नाही. मायनींग कंपनीने स्थानिकांना प्रधान्याने याठिकाणी कामाला ठेवावे अशी मागणीही जनसुनावणी दरम्यान करण्यात आली. यावेळी कंपनीच्यावतीन या प्रकल्पाचे गावांसाठी होणारे फायदे विशद केले. तर ग्रामस्थांच्या मनात असणारे गैरसमज दूर केले. या ठिकाणी ६० जणांना प्रत्यक्ष तर ३०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून देण्याची ग्वाही मिनरल्स अॅण्ड मेटल्स’च्या माध्यमातून देण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारी,अर्ज देखील स्वीकारण्यात आले.

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी ग्रामस्थांच्या मतांचा विचार करत गावाच्या हिताचा निर्णय शासनाकडून घेतला जाईल अस सांगत हि जनसुनावणी संपल्याच जाहीर केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार प्रवीण ल़ोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, जि. प सदस्य प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नामदेव राणे,सौ.सायली पोखरणार,पं. स. माजी सदस्य चित्रा कनयाळकर, ग्रामविकास अधिकारी इंगळे, सर्कल, तलाठी सोळंकी, मायनींग कंपनीचे जनरल मॅनेजर नारायण प्रसाद, श्री गिल, गजानन करकरे,  शिवप्रसाद, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, आनंद भिसे, विनोद नाईक, वंदना कांबळी, शिल्पा वस्त, नंदिनी मांजरेकर, संजय कांबळी,रमेश राणे, राजेंद्र कांबळी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, आत्माराम राणे, निलेश रेडकर, ट्रक चालक मालक संघटनेचे गुणाजी मांजरेकर, गोपाळ राऊळ, दत्तगुरू भगत, अण्णा गडेकर, बाळू कांबळी, संदीप कांबळी, निलेश कामत, संदीप बुधजी, सागर राऊत, परेश राऊळ, सुहास राणे यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..