सावंतवाडी /-

भर वस्तीत घुसून बिबट्याने बकरीवर हल्ला केल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथे घडली आहे. चराठे येथील शेतकरी शकुन नथाप यांच्या बकरीवर भरवस्तीत फिरणाऱ्या बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने बकरी पळून जाण्यास यशस्वी झाली आणि वाचली. मात्र या प्रकाराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार काल रात्री घडला. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी माहिती दिली असून भरवस्तीत फिरणाऱ्या बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी करून देखील कोणी दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबद्दल त्यांनी नाराजी वेक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page