You are currently viewing सिंधुदुर्गातील गोसावी समाजाचा मेळावा २५ डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गातील गोसावी समाजाचा मेळावा २५ डिसेंबर रोजी

सिंधुदुर्ग /-

नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग या मंडळाचा स्नेहमेळावा शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ०३.०० या वेळेत सिध्दिविनायक हाँल कुडाळ रेल्वेस्टेशन रोड ता.कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मेळाव्यात गोसावी समाजातील सन २०२० व सन २०२१ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे मंडळाने ठरविले आहे. तरी जे विद्यार्थी इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण, पदवीका पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण, एन.टी.एस. व एन.एम.एम.एस. उत्तीर्ण व पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत अशा सन २०२० व सन २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्यांनी आपल्या गुणपत्रकांची झेरॉक्स प्रत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांकडे दिनांक १९ डिसेंबर २०२१ पर्यंत पाठवावीत. असे आवाहन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच आँनलाईन गायन स्पर्धा व निंबध स्पर्धा घेण्यात आली होती. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व गोसावी समाजबांधवांनी उपस्थित रहावे आणि अधिक माहिती साठी संस्थेचे सेक्रेटरी भालचंद्र गोसावी मो.नंबर ९४२०२०४४१७ यांच्या कडे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..