You are currently viewing जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा मनमानी कारभार.;डाॅ नंदन वेंगुर्लेकर

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा मनमानी कारभार.;डाॅ नंदन वेंगुर्लेकर

क्रीडा क्षेत्रामधून तीव्र संताप व नाराजी..

सिंधुदुर्ग /-

खेलो इंडिया या उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना यांचे सहकार्य व मदत घेण्याचे स्पष्ट व लेखी आदेश असताना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार करीत असल्याने राज्याच्या अधिकृत परिपत्रकाला केराची टोपली दाखवली यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी क्रीडा प्रेमीमधून होत आहे.

ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, पुणे यांच्या दिनांक 12/11/2021 मधील सूचना क्रमांक 5 मध्ये विशेष सूचना असूनही सदर आदेशाचे उल्लंघन ही गंभीर बाब आहे यासाठी शिंदे यांच्या वर कर्त्यव्यात कसूर केल्या प्रकरणी विभागीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी क्रीडामंत्री, क्रीडा आयुक्त, खासदार, पालकमंत्री, सर्व आमदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात करणार असल्याचे श्री. नंदन वेंगुर्लेकर सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन, सिंधुदुर्ग तथा सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा ऑलिंपिक असोसिएशन, सिंधुदुर्ग यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..