You are currently viewing अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

सिंधुदुर्ग /-

तौक्ते वादळाने १५ मे ला पावसाने हजेरी लावली.या वादळात प्रचंड नुकसानी झाली.कोरोना,तौक्तेवादळ एका पाठोपाठ संकटाचा भडिमार होत असताना तब्बल सहा महीन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप पाऊस जाण्याची चिन्हे दिसेनात.हातीतोंडी आलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसानी झाली.नोव्हेबर महीना संपत आला तरी थंडी पडत नसल्याने काजू,आंबा बागायतदार धोक्यात आले.एकापाठोपाठ नव्या संकटाचा सामना करताकरता शेतकर्यांचे कंबरडे मोडले.उदरनिरवाह चालवायचा कसा या विवंचनेत शेतकरी सांपडला आहे.शेती प्रधान देशाचा कणाच जर मोडला तर देश कसा चालणार. मात्र या शेतकर्याकडे मागे वळुन बघायला कोणाला सवडच मीळत नाही.घाटमाथ्यावर शेतकरी आत्महत्या करतात.मात्र कोकणातला शेतकरी खबिरपणे संकटाचा सामना करताना दिसत आहे.पण आज या शेतकर्यांची दखल घेणे ही काळाची गरज आहे.

अभिप्राय द्या..