You are currently viewing बेळणे येथे रोख रक्कमेसह सोन्याची चोरी करत कागदपत्रांची जाळपोळ.;कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.

बेळणे येथे रोख रक्कमेसह सोन्याची चोरी करत कागदपत्रांची जाळपोळ.;कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.

कणकवली /-

सांगली तालुक्यातील बेळणे खुर्द सतीचा माळ येथे फिर्यादी देवदास बाबुराव कारांडे हे आपल्या आई सोबत राहतात. बेळणे येथे त्यांचे एक छोटे हॉटेल असून त्यावर त्यांची उपजीविका चालते. दरम्यान,काल हॉटेलमध्ये वेळ झाल्याने ते हॉटेलला राहिले होते.मात्र,पहाटे ५.३५ वाजता शेजाऱ्यांनी फोन करत तुमच्या घरात आग लागली आहे, असे कळवले. त्यानुसार आम्ही गेलो असता घरातील कपडे व कागदपत्रांची जळून खाक झाले होते. तर एक टोळ्यांची बोरमाळ व रोख पाच हजार रुपयांची चोरी झाली होती. देवदास बाबुराव कारांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भादवी कलम ४३६,४५१,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर फिर्यादीने घर मालकाला वरच संशय व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , सदर फिर्यादी देवदास बाबुराव कारांडे यांची आई सखूबाई कारांडे या १९९३ साली डॉ. देसाई यांच्या कडे बागेत काम करत होत्या.त्यानंतर डॉ देसाई यांनी काही वर्षांनी ही बाग अरुणकुमार जगदीश्वर सिन्हा यांना विकली.१९९८ साली त्यांनी त्या ५ एकरच्या बागेत पामतेल प्रकल्प केला.त्यापासून सखूबाई या कामाला होत्या,२००४ साली पामतेल कंपनी बंद पडली.त्यामुळे सखुबाई यांचा २००१ ते २००४ या कालावधीतील ४१ हजार पगार बाकी होता.पगार बाकी असल्याने त्यावेळी त्या बागेतील घरात रहायला सांगितले होते.त्याबद्दल फिर्यादी यांची आई सखुबाई कारांडे यांनी कामगार न्यायालय मुबंई येथे दावा दाखल केला आहे.

यानंतर संबंधित जमीन व घर मालक अरुणकुमार जगदीश्वर सिन्हा आम्हाला घर खाली करण्यासाठी धमकी व अन्य प्रकारे त्रास दिला आहे.आता ती जमीन विक्री केली जात असताना आम्ही अटकाव करत असल्याचा मनात राग धरुन घर मालकानेच ही चोरी व कागदपत्रे जाळली असल्याची फिर्याद देवदास बाबुराव कारांडे याने दिली.मात्र ,सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी समोर नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. देठे करीत आहेत.

अभिप्राय द्या..