You are currently viewing पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधील भ्रष्टाचारांची तपासणी व्हावी.;आ.वैभव नाईक.

पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधील भ्रष्टाचारांची तपासणी व्हावी.;आ.वैभव नाईक.

.पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर यांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली मागणी

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत भेट घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांचे लक्ष वेधले. पंचायत राज समिती 30 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये वॉटर प्युरिफायर सह अन्य अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचारा संदर्भात लक्ष वेधताना या सर्व भ्रष्टाचाराची तपासणी पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान व्हावी अशी मागणीही आ.वैभव नाईक यांनी समितीचे अध्यक्ष आमदार रायमुलकर यांच्याकडे केल्याची माहिती दिली.

दरम्यान या मागणीनुसार डॉ. रायमुलकर यांनी या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पंचायतराज समितीच्या तपासणी पूर्वी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन आढावा घेतला जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांना दिली.

अभिप्राय द्या..