You are currently viewing रस्त्याच्याकडेला बसणा-या भाजी विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम कुडाळ नगरपंचायतीने घेतली हाती..

रस्त्याच्याकडेला बसणा-या भाजी विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम कुडाळ नगरपंचायतीने घेतली हाती..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या,तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यासह गटारावर वस्तू विक्रीसाठी लावलेल्या विक्रेत्यांवर भाजी व वस्तू काढण्यासाठी नगरपंचायतीने मोहीम हाती घेतली मात्र या मोहिमेत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसोबत व्यापा-यांची शाब्दिक बाचाबाची झाली दरम्यान नगरपंचायतीने दिलेल्या नियोजित जागेमध्ये एकही विक्रेता व्यवसाय करण्यासाठी गेला नाही आज (गुरुवारी) व्यवसाय बंद त्यांनी ठेवला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व नगरपंचायतीच्या गटारावर तसेच रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करण्यासाठी बसणाऱ्या भाजीविक्रेता त्यांना मारुती मंदिर नजीक असलेल्या भाजी मार्केटमध्ये बसण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार कुडाळ नगरपंचायतीने याबाबत सर्वे केला त्यामध्ये दररोज १३० भाजीविक्रेते रस्त्यावर कडेला बसून भाजी विक्री करतात असे निदर्शनास आले त्यानुसार त्यांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले यासाठी आधार कार्ड,रेशन कार्ड घेण्यात आले व दर बुधवारच्या आठवडा बाजारामध्ये ४२ इतर व्यापारी येतात याची नोंद घेण्यात आली आणि त्यांना हि नोंदणी पत्र देण्यात आले नोंदणी पत्रानुसार या सर्व व्यापाऱ्यांना मारुती मंदिर येथील भाजी मार्केट तसेच पान बाजार येथील शॉपिंग सेंटरमध्ये आपली दुकाने लावावीत अशा सूचना वारंवार देऊन सुद्धा त्यांनी प्रशासनाचे ऐकले नाही त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रशासनाने आज (गुरुवारी) गटारावर तसेच रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना उठविण्यास सुरुवात केले त्यावेळी व्यापारी व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली मात्र शासनाच्या नियमानुसार ही कारवाई करावी लागेल असे सांगितले आणि दिलेल्या जागेमध्ये तुम्ही तुमची दुकाने लावावीत असे सांगितले मात्र त्याठिकाणी एकही कर्मचारी व्यापारी गेला नाही ही कारवाई नगरपंचायतीच्या कर विभाग प्रमुख कोरगावकर यांच्यासह १० कर्मचाऱ्यांनी केले.

अभिप्राय द्या..