वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपरिषदेने आज स्वच्छतेच्या बाबतीत आज जी अनेक पारितोषिके मिळविली आहेत,ती विशेष उल्लेखनीय आहेत.परंतु खासदार विनायक राऊत यांनी कालच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात वेंगुर्ले नगरपरिषदेवर ज्या पद्धतीने टीका केली आहे ते निषेधार्ह आहे,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.वेंगुर्लेत मंगळवारी झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व वेंगुर्ले नगरपरिषद यांच्यावर टीका केली होती.त्यावर वेंगुर्ले भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप,भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, सोमनाथ टोमके,नितीन चव्हाण,बाबली वायंगणकर,दादा केळुसकर,फर्नांडिसपदाधिकारी आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना माजी आमदार राजन तेली म्हणाले की आज वेंगुर्ले नगरपरिषद आदर्शवत कार्य सुरु आहे.या न.प.चे चांगले काम झाले आहे.विविध विकासकामे, स्वच्छतेच्या विविध पुरस्कार याबरोबरच सुसज्ज मच्छीमार्केट,कलादालन,तसेच नाविन्यपूर्ण गोष्टी या न.प.ने पूर्ण केल्या आहेत.चांगले काम करणाऱ्या जि.प.व वेंगुर्ले न.प.वर खासदारांनी टीका करणे निषेधार्ह आहे.आज जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्याने जनता नाखूष आहे.त्यामुळे आगामी कालावधीत १०० टक्के सत्ता भाजपचीच येईल.तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आज केंद्रात जे पद प्राप्त झाले आहे,त्यामुळे जनतेच्या रोजगाराच्या दृष्टीने हितावह आहे,असेही राजन तेली म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page