You are currently viewing मी डीपीडिसी ची बैठक घेऊन १६ नोव्हेंबरला रत्नागिरीत जाणार मला कोणीते अडवून दाखवाव.;पालकमंत्री उदय सामंत यांच आ.नितेश राणेंना प्रत्युत्तर..

मी डीपीडिसी ची बैठक घेऊन १६ नोव्हेंबरला रत्नागिरीत जाणार मला कोणीते अडवून दाखवाव.;पालकमंत्री उदय सामंत यांच आ.नितेश राणेंना प्रत्युत्तर..

सिंधुदुर्गनगरी /-

डीपीडिसी ची बैठक लावा, मग इथून रत्नागिरीत तुम्ही जावून दाखवा, असा इशारा आ. नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांना दिला होता. या इशाऱ्याला आज पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की,१६ नोव्हेंबरला जिल्हा नियोजनची बैठक घेऊन मी रत्नागिरीला जाणार,ज्यांनी कोणी सांगितले आहे dpdc बैठक घेऊन रत्नागिरीत जाऊन दाखवा त्यांनी मला,कोणीते अडवून दाखवा अशा शब्दात उदय सामंत यांनी आमदार नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलय.

जिल्हा नियोजनची बैठक ६ महिन्यांच्या आत लावाली गेली,पाहिजे होती. मात्र, जिल्हा नियोजनकडे विकास निधी नसल्यामुळे ही बैठक होत नाही आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.असा आरोप आमदार नितेश राणेंनी केला होता.मात्र, या आरोपाचं खंडन पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केलं. खरतर जिल्हा नियोजनची बैठक आम्ही कधीच लावली होती.मात्र, जि. प. अध्यक्षा आणि महिला बालकल्याण सभापती यांनी सहलीचे कारण देऊन,आम्ही लावलेली बैठक पुढे घेण्यात यावी अशी विनंती केली होती.त्यांच्या विनंती पत्रामुळे जिल्हा नियोजनची बैठक पुढे ढकलण्यात आली होती.ही वस्तूस्थिती विरोधक लपवत आहेत.आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. मात्र, आम्हाला ‘त्या’ विषयाच्या खोलात जायचं नाही.जिल्हा नियोजनची बैठक येत्या १६ नोव्हेंबरला होणार आहे. ही बैठक घेऊन मी रत्नागिरीला निघणार आहे.त्यामुळे मला कोणीते अडवून दाखवाव असं प्रत्त्युत्तर पालकमंत्री उदय सामंत यांनी नितेश राणेंना दिलंय.

अभिप्राय द्या..