You are currently viewing पी.के.चौकेकर यांचा सेवानिवृत्तीपर चौके गावात सत्कार..

पी.के.चौकेकर यांचा सेवानिवृत्तीपर चौके गावात सत्कार..

चौके /-


मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचे जेष्ठ लिपिक तथा सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, तसेच गावातील विकासकामात त्यांचा असलेला सहभाग याची दखल घेऊन सहयोग बौद्ध विकास मंडळ व जागृती महिला मंडळाच्या वतीने चौके सम्यक नगर समाज मंदिर येथे सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे व माजी पोलीस पाटील मंडळाचे अध्यक्ष दुलाजी चौकेकर यांच्या हस्ते तर उद्योजक नानाशेठ आंबेरकर पत्रकार संतोष गावडे, कृष्णा चौकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार नितीन गावडे, चौके व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदु राणे, मंडळाचे मुंबईचे सल्लागार साबाजी चौकेकर, उपाध्यक्ष अनंत चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दिपीका चौकेकर, मनोज चव्हाण, प्रज्ञा चौकेकर, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष जयश्री चौकेकर, भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष सुभाष चौकेकर, अनंत बळिराम चौकेकर, किशोर कदम, दिपक चौकेकर, अनिशा चौकेकर, गीता चौकेकर, अनिता चौकेकर, नामदेव चौकेकर, रामचंद्र कदम, आकाश चेंदवनकर, अमीत चौकेकर आदि उपस्थित होते. प्रतिकुल परिस्थिती मध्ये पी.के.चौकेकर यांनी शिक्षण घेऊन नोकरी मिळाल्यानंतर आपली स्वतःची आपल्या कुटुंबाची प्रगती करताना ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजा प्रती सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्य करत आहेत आणि गावाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील नावलौकिक ही आमच्या चौकै गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे भावोद्गार काढले. तर सत्काराला उत्तर देताना पी.के.चौकेकर म्हणाले. ” माझ्या समाजाने, गावाने जो माझा सेवानिवृत्तपर सत्कार केला तो आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याची व त्यांच्या विचारांपासून घेतलेल्या प्रेरणेतून केलेल्या कामाची पोचपावती आपण सर्वांनी मला दिली. मी आपणा सर्वांच्या ऋणात राहून असेच कार्य पुढे चालू ठेवणार ” अशी ग्वाही दिली.

यावेळी संतोष गावडे, साबाजी चौकेकर, दुलाजी चौकेकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक किशोर कदम यांनी केले तर कृष्णा चौकेकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..