You are currently viewing इंटकचे अशोक राणे यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा..

इंटकचे अशोक राणे यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा..

कुडाळ /-

महाराष्ट्र एसटी वर्कर्स (इंटक) सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष, एसटी कामगार नेते अशोक राणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कणकवली भगवती हॉल येथे आज पार पडला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी उपस्थित राहून अशोक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अशोक राणे यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी लाभो अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इंटकचे कार्याध्यक्ष एच. बी. रावराणे, जिल्हा सचिव पांडुरंग गावडे, जिल्हा कार्याध्यक्ष लियाकत शेख, कणकवली सभापती मनोज रावराणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, श्री. देवधर, सौ. राणे, अभय खडपकर, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, श्री. राणे. आदींसह अनेक मान्यवर ,नागरिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..