You are currently viewing आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी ५ ची यशस्वी चाचणी..

आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी ५ ची यशस्वी चाचणी..

नवी दिल्ली /

संरक्षण दलाने बुधवारी संध्याकाळी ७.५० मिनिटांनी आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

अग्नी ५ हे यापुर्वीच विविध चाचण्यांनंतर संरक्षण दलाच्या सेवेत दाखल झालं आहे. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांपैकी आजची अग्नी ५ची चाचणी होती.संरक्षण दलासाठी आवश्यक अण्वस्त्रांचे नियंत्रण करणाऱ्या ‘स्ट्रटेजिक फोर्स कमांड’ ( Strategic force command ) या विभागाने ओडिशा इथल्या ऐ पी जे अब्दुल कलाम या बेटावरुन ही यशस्वी चाचणी केली.

पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर अचुकतेने मारा करण्याची अग्नी ५ क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अग्नी ५ हे दीड टनाएवढा दारुगोळा किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. अग्नी ५ मुळे याआधीच संपूर्ण चीन हा मारक टप्प्यात आला आहे. जगात मोजक्या देशांकडे एवढ्या दूरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. देशाकडे ‘अग्नी’ या प्रकारातील विविध मारक पल्ला असलेली ५ प्रकारची क्षेपणास्त्रे सेवेत आहेत. अग्नी १ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० किलोमीटर आहे. अग्नी २ चा पल्ला २०००-३०००, अग्नी ३ चा पल्ला ३५००, अग्नी ४ चा पल्ला ४००० आणि अग्नी ५ चा पल्ला ५००० किलोमीटर पेक्षा जास्त आहे.

अभिप्राय द्या..