You are currently viewing पणदुर येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना अमरसेन सावंत मित्रमंडळाचा पुढाकार..

पणदुर येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना अमरसेन सावंत मित्रमंडळाचा पुढाकार..

कुडाळ /-

श्री.अमरसेन सावंत मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मंदिर,पणदूरतिठा येथे माजी सरपंच कै.शंकर उर्फ बाळू गावडे व माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ भजनाचा तिरंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

या तिरंगी डबलबारी भजनांचा आमने सामने जंगी सामन्यात बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज साथ भावेश राणे व तबला साई नाईक, बुवा संदीप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत व तबला संदेश सुतार, बुवा गुंडू सावंत यांना पखवाज साथ विराज बावकर व तबला साथ विवेक कदम करणार आहेत.

या तिरंगी डबलबारी भजन सामन्याला आमदार वैभव नाईक , खा विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, उपस्थित राहणार आहेत. तरी या तिरंगी सामन्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमरसेन सावंत मित्रमंडळाने केले आहे.

अभिप्राय द्या..