वेंगुर्ला /-


पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावापैकी ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार आहे. इटलीसारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्या एवढे क्षेत्र असलेल्या देशात २० हजार कृषि पर्यटन व्यवसाय कार्यरत आहे. या जिल्ह्यात कृषी क्षेत्र मोठे असल्याने कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन विकसित होऊ शकते. शासनाने पर्यटन विकास विकसित करण्यासाठी नवीन डिपार्टमेंट सुरू केलेले आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक पर्यटन कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले.वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात पर्यटन संचालनालय ( DoT ) उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा पार पडली. यावेळी उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यात पर्यटन प्रशिक्षण संचालक मनोज हाडवळे, निसर्ग पर्यटनचे प्रमुख समन्वयक तथा संचालक संजय नाईक, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, पर्यटन महासंघ उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , वेंगुर्ले अध्यक्ष दिनानाथ वेर्णेकर यासह ७४ पर्यटक व्यवसायिक उपस्थित होते.यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील महेश सामंत यांना कृषी पर्यटन केंद्र मंजुरीचे सर्टिफिकेटस देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page