मालवण/-
रविंद्र चव्हाण माजी राज्यमंत्री, आमदार, भाजपा नेते, यांच्या वाढदिवसा निमित्त विजय केनवडेकर, जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी व गणेश कुशे गटनेता व नगरसेवक यांचा संयुक्त विद्यमाने वँपोरायझर (वाफ घेण्याचे मशिन) वाटप मालवण येथे करण्यात आले.
मालवण शासकीय कोविड सेन्टर येथे डॉ. बालाजी पाटील यांचा कडे वँपोरायझर मशिन देण्यात आल्या. या सेन्टर मध्ये दोन मशिन असल्याने या मशिन देण्यात आल्या या मुळे प्रत्येक कोविड रुग्णाला स्वतंत्र मशिन मिळणार आहे. मालवण भैरवी मंदिर,संत सेना मार्ग येथे दाट वस्ती व केशकर्तनालय मालक व कामगार असल्याने येथे कोरोना संक्रमण होऊ शकते म्हणुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला वँपोरायझर मशिन देण्यात आली.
यावेळी उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर नगरसेवक दिपक पाटकर, विलास हडकर,भाऊ सामंत, नगरसेवक आप्पा लुडबे, सौ.पुजा सरकारे, बबन परुळेकर,विजय चव्हाण,दिलीप वांयगणकर, उदय चव्हाण, रामा चव्हाण, हेमन्त घडशी व भाजपा कार्यकते उपस्थित होते.