सावंतवाडी /-
मळेवाड – कोंडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपला गड राखला. भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनेलच्या मिलन विनायक पार्सेकर या 8 मतांनी विजयी ठरल्या तर सानिका शेवडे यांना स्वतःचेच एक मत पडले.
यावेळी 11 सदस्यांपैकी 9 सदस्य उपस्थित होते. जनता गाव विकास पॅनेलकडून काडीमोड घेत सरपंचपदासाठी सेना पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सानिका शेवडे यांना मतदानावेळी सेनेचे सदस्य अर्जून उर्फ तात्या मुळीक व कविता शेवडे गैरहजर राहत मतदान झाल्यानंतर उपस्थित झाले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी त्यांना आधीच गैरहजर म्हणून घोषित केल्याने आयत्या वेळी शेवडे यांना सेनेने एकाकी पाडले. मळेवाड सरपंच पद रिक्त असल्याने प्रभारी सरपंच म्हणून हेमंत मराठे काम पाहत होते. या निवडणूक प्रक्रियेवेळी हेमंत मराठे, महेश शिरसाट, स्नेहल नाईक, मधुकर जाधव, अमोल नाईक, गिरीजा मुळीक, खुशी कुंभार हे जनता गाव विकासचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हण्ूान प्रशांत चव्हाण यांनी काम पाहिले.
