You are currently viewing वैभव नाईकांकडून कणकवलीत व्यापाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप..

वैभव नाईकांकडून कणकवलीत व्यापाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप..

वैभव नाईक यांनी कुडाळात जाऊन दुकाने बंद करावी..

कणकवली /-

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद वेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी सुरू असलेल्या बेकरीच्या शटरवर लाथा मारल्या. शिवसेनेच्या या जबरदस्तीचा निषेध करत आहोत. आमदार वैभव नाईक कणकवली भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कुडाळात जाऊन दुकाने बंद करावीत. व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत. त्या बेकरी मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत असेही नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.

लखीमपूर मधील घटनेचा आम्हीही निषेध करतो. ज्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली त्यांना गुलाबपुष्प देत नगराध्यक्ष नलावडे यांनी स्वागत केले. कणकवली शहरात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा पुरता फज्जा उडाला. मात्र सुरू असलेल्या बेकरीचे शटर माजी नगरसेवक असलेल्या शिवसैनिक भूषण परुळेकर व अन्य शिवसैनिकांनी जबरदस्तीने बंद केले. या धाकदपटशाही चा आम्ही निषेध करतो. एकेकाळी बाळासाहेबांनी एक आवाज दिला की सगळा महाराष्ट्र ठप्प होत असे. पण आता शिवसेनेच्या हाकेवर एक दुकान बंद होत नाही, याचे आत्मपरीक्षण सेनेने करावे, असा टोलाही नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला.

अभिप्राय द्या..