You are currently viewing बांदा दोडामार्ग आणि दोडामार्ग विजघर हवाई मार्गाने जोडावे,मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांचा टोला..

बांदा दोडामार्ग आणि दोडामार्ग विजघर हवाई मार्गाने जोडावे,मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांचा टोला..

दोडामार्ग /-

मुबंई ते सिंधुदर्ग ज्या प्रमाणे हवाई मार्गाने जोडला त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी दोडामार्ग ते बांदा आणि दोडामार्ग ते विजघर हवाई मार्गाने जोडावे असा टोला मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी मारला आहे.
सत्ताधाऱ्यांकडे येवढी वर्ष सत्ता असून सुद्धा बांदा ते दोडामार्ग व दोडामार्ग ते विजघर हा रस्ता व्यवस्थित करू शकत नाही,गेली अनेक वर्षे या रस्त्यांची कामे रखडलेल्या स्थितीत आहेत. आमदार दिपक केसरकर मात्र कायम निवडणूकीच्या वेळी खोटी आश्वासने देवून जनतेच्या डोळ्यांत धुळ फेकतात . मात्र आता जनतेच्या डोळ्यांत धुळ फेकायची बंद करून रस्त्यावरील धुळीवर व खड्ड्यांवर उपाय करावा असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुनिल गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

अभिप्राय द्या..