वेंगुर्ला /-

वेंगुर्ला सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला शहरातही कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याकरीता डॉक्टरांचा अभाव, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा या गोष्टींचा विचार करता नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व्यापारी, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी या सर्वांची तातडीने बैठक घेऊन वेंगुर्ला शहरात जनता कर्फ्यु बाबत निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवदेन वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले. दरम्यान, मच्छि व्यवसाय करणा-या विक्रेत्यांना आपल्याकडून दिल्या गेलेल्या जागेमध्ये उन्हाचा त्रास होत आहे. अजूनही पाऊस सुरु असल्याने मच्छिविक्रीच्या ठिकाणी तात्पुरते छत उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा महिला संघटक श्वेता हुले, शहर महिला संघटक मंजूषा आरोलकर,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, युवासेना शहर चिटणीस सुयोग चेंदवणकर, शाखाप्रमुख हेमंत मलबारी, शिवसैनिक सचिन वालावलकर, सुहास मेस्त्री, संदिप केळजी, गजानन गोलतकर, सुनिल वालावलकर, डेलिन डिसोजा, आनंद बटा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page