कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पारंपारिक लोककला आहेत या सर्व लोककला एका छताखाली येण्या साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांच्या वतीने कार्य चालु आहे.जेणेकरून या कलावंताना राजाश्रय नाही आहे पण लोकाश्रय आहे.तर अनेक लोककला या लोप पावत चालल्या आहेत. म्हणुन ही एक संकल्पना घेऊन दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांनी सर्व लोक कला एकाच रंगमंचावर आणुन एक इतिहास रचला आहे.त्यामुळे भजन,धनगरीनृत्य,गोंधळ,फुगडी,चपई नृत्य, डबलबारी,कीर्तन, दशावतार,कळसुत्री बाहुल्या,अशा अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी या संघाने पहीले पाऊल टाकले आहे.तसेच शासन दरबारी आपण राजाश्रय मिळवण्यासाठी आणि भविष्यात खऱ्या अर्थाने नांदी ठरू शकते असं सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते एम.के .गावडे यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.यावेळी उपस्थित चालक-मालक संघाचे अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा परब, सचिव सचिन पालव, खजिनदार देवेंद्र नाईक, सहसचिव सुधीर कलिंगन, मारुती सावंत, गौरव शिर्के, नाना प्रभु ,सौरव पाटकर, सुधाकर दळवी ,शरद मोचेमाडकर आदी उपस्थित होते.
