महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने केल्या या मागण्या!

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने केल्या या मागण्या!

मसुरे /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले परजिल्ह्यातील शिक्षक कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे आपल्या मूळ गावी गेलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना आपल्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.काही शिक्षकांच्या घरी वृद्ध आई वडील ,बहिण, भाऊ पत्नी-मुले असून गेली दीड वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहिले आहेत.त्यामुळे सर्व शिक्षकांना कोणत्याही प्रकारची कोविड ड्युटी न देता गणेश चतुर्थी सुट्टी देण्यात यावी आणि परजिल्ह्यातील शिक्षकांना या कालावधीत स्व जिल्ह्यात जाण्याची व मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन व शिक्षणाधिकारी श्री .एकनाथ आंबोकर यांच्याजवळ करण्यात आली.
सद्यस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या पगाराचा विचार करता शासनाकडून निधी प्राप्त होऊनही सातत्याने उशिरा पगार होत आहेत . याबबत प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही कोणतेही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही . याबाबत संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली . तसेच पुढील महिन्यात १० सप्टेंबर २०२१ रोजी कोकणातील अत्यंत महत्वाचा व मोठा गणेश चतुर्थीचा सण असून तो उत्सव कोकणात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो . त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी सर्व शिक्षकांना माहे ऑगस्टचा पगार देण्यात यावा. तसेच कोविड १९ या महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी पालन करून प्राथमिक शिक्षकांनी गेले दीड वर्ष लोकांमध्ये जनजागृतीचे काम तसेच शालेय कक्ष व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, चेक पोस्ट, रेल्वे स्टेशन, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी कोविड ड्युटी बजावलेली आहे त्याच बरोबर शैक्षणिक सत्र २०२१-२२ सुरू झालेले असल्याने त्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन सेतू अभ्यासक्रमाची व शैक्षणिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ही सुरू केली आहे. हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्य त असलेले परजिल्ह्यातील शिक्षक कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपल्या मूळ गावी गेलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना आपल्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.काही शिक्षकांच्या घरी वृद्ध आई वडील ,बहिण, भाऊ पत्नी-मुले असून गेली दीड वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहिले आहेत. काही शिक्षकांचे नातेवाईक या महामारी मुळे मृत झालेले आहेत त्यांच्या दुःखातही त्यांना सहभागी होता आले नाही तसेच काही शिक्षकांचे आई वडील ही या काळात मृत झालेले आहेत त्याचं दुःख उराशी बाळगून ते या ठिकाणी आपले शैक्षणिक कामकाज प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. या यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, मालवण तालुका उपाध्यक्ष कृष्णा कालकुंद्रीकर, नागेश जाधव व विकास कपाटे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..